ऍसिडिटी : लक्षणे,कारणे, उपाय अशी घ्या काळजी

ऍसिडिटी : लक्षणे,कारणे,उपाय

ऍसिडिटी : लक्षणे,कारणे, उपाय अशी घ्या काळजी

 

ऍसिडिटी : लक्षणे,कारणे,उपाय

ऍसिडिटी : लक्षणे,कारणे,उपाय 

साधारणतः सर्वानाच एकदा ना एकदा पोटामध्ये जळजळ व छाती मध्ये जळजळ असा अनुभव आलाच असेल मग तुम्ही त्याला ऍसिडिटी समजून लगेच मेडिकल मधून गोळी घेता. पण एकदा तरी तुम्ही हे कशामुळे होत आहे या मागे अशी कोणती करणे असतील याचा विचार केलाय का ? जर तुम्हाला हा त्रास नेहमी होत असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष देऊन न नेहमी मेडिकल मधून गोळी घेऊन चूक करताय. तुम्ही लावलेला अंदाज तर बरोबर आहे पण ऍसिडिटी मध्ये काय केलं पाहिजे ? ती नेहमी होणार नाही यासाठी काय उपाय केले का ? जर तुमचं उत्तर नाही असेल तर काळजी करू नका या लेखातून तुम्हाला ऍसिडिटी बद्दल सर्व माहिती भेटेल.

ऍसिडिटी म्हणजे काय ?

ऍसिडिटी ची मुख्य कारणे ?

लक्षणे

तुम्ही उपचार कसे घ्याल ?

ऍसिडिटी म्हणजे काय?

आपण जे अन्न खातो ते अन्ननलिकेमार्फत आपल्या पोटामध्ये जाते. अन्न जेव्हा पोटामध्ये जाते तेव्हा जठरामधील ग्रंथी रस (ऍसिड) तयार करतात व तो अन्ना मध्ये मिसळला जातो त्याचा उपयोग आपण खाल्लेलं अन्न पचन करण्यासाठी केला जातो. जेव्हा या ग्रंथी प्रमाणापेक्षा जास्त रस तयार करतात तेव्हा आपल्या पोटामध्ये जळजळ होते त्यालाच आपण ऍसिडिटी बोलतो. मुख्यतः ग्रंथी जास्त रस तयार करण्याची वेगवेगळी करणे असू शकतात. ती आपण जाणून घेणार आहोत.
काही वेळेस तयार झालेलं जास्त ऍसिड हे आपल्या अन्ननलीमध्ये वर जाते व त्यामुळे आपल्या छाती मध्ये जळजळ व्हाल सुरवात होते. त्यालाच आपण हार्ट बर्न असे बोलतो.
पोटामध्ये आग लागणे आणि छाती मध्ये जळजळ करणे हि जरी ऍसिडिटी ची करणे असतील तरी ती सतत होणे योग्य नाही जास्त दिवसाचा त्रास तुम्हाला नंतर तीव्र नुकसान पोचवू शकतो .
दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवस असा त्रास होत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुमचे दुर्लक्ष तुम्हाला खालील रोगांचा बाळू करू शकतो.

१)अन्ननलिकेचा त्रास:-

अन्ननलिका अन्न तोंडापासून ते पोटापर्यंत पोहचवण्याचे काम करते पण जेव्हा पोटामध्ये अतिरिक्त प्रमाणात ऍसिड होते तेव्हा ते काही कंडिशन मध्ये आपल्या अन्ननलिकेमध्ये वरच्या दिशेने जाते व छाती मध्ये जळजळ होते व त्यामुळेच तुमच्या अन्ननलिकेमध्ये व्रण येऊ शकतात ज्याला आपण अल्सर असे बोलतो.

२)अन्ननलिकेचा कर्करोग :-

जर तुमच्या कुटुंबामध्ये हा त्रास पूर्वी पासून चालू असेल तर अशा व्यक्तीला अन्ननलिकेचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

३)दात किडणे :-

अन्ननलिकेमध्ये परत येणारे ऍसिड हे तुमच्या दातांमध्ये पोकळी निर्माण करू शकते.

ऍसिडिटी होण्याची मुख्य कारणे 

जठर ग्रंथी मधून जेव्हा ऍसिड अतिरिक्त प्रमाणात तयार केले जाते व त्यामुळे ऍसिडिटी होते .
जेवण करण्याची चुकीच्या पद्धती

१.  वेळेत जेवण न करणे.
२. एखाद्या दिवशी उपाशी राहणे . (आपण जरी आपली सगळी कामे नियमित करत नसलो तरी आपले शरीर हे त्याचे काम नियमित करते जसे कि तुमच्या नेहमीच्या जेवणाच्या वेळेत जठर ग्रंथी पाचक रस तयार करून पोटामध्ये सोडतात न त्यावेळेस तुम्ही जेवण नाही केले तर त्या ऍसिड चा काहीच उपयोग होत नाही व त्यामुळेच पोटामध्ये ऍसिड चे प्रमाण वाढते व तुम्हाला ऍसिडिटी चा त्रास व्हाल सुरवात होते म्हणून नियमित वेळेत जेवण करणे गरजेचे असते)
३. जेवण करून पटकन झोपणे. (काही लोकांना जेवण केल्यावर लगेच झोपायची सवय असते हि खूप वाईट सवय आहे तुम्ही जेवण करून ते पचन होण्यास थोडा तरी वेळ दिला पाहिजे ना? जेवण झाल्यावर थोडं चालणे तुम्हाला जेवलेलं अन्न पचन करण्यास मदत करते. त्यामुळे जेवण झाल्यावर थोडं चालण्याची सवय तुमच्या शरीराला लावून घ्या )

४. आजकाल बाहेरील जंक फूड (अन्न ) खाण्याकडे जास्त कल आहे. घरचे चांगले शिजवलेले अन्न आवडत नाही मात्र बाहेरील जंक फूड मात्र आवडीने खातात. खरंच कधी या गोष्टींचा नीट विचार केलात का ? बाहेरील अन्न हे कधी तरी खाल्ला तर ठीक आहे परंतु ते नेहमी खात असाल तर तुम्हाला त्रास होणे भागच आहे म्हणून जंक फूड खाणे टाळा न शरीराला घरचे खाण्याची व फळे खायची सवय लावा जि तुमच्या शरीराला नेहमी निरोगी ठेवेल.
५. जेवण करताना तयार झालेल्या अन्नामध्ये मीठ घेण्याची काहींना सवय असते ती गोष्ट पण हा त्रास करते.
६. दिवसातून अतिरिक्त प्रमाणात चहा, कॉफी, शीतपेये , मद्यपान घेतल्याने सुद्धा ऍसिडिटी होते. (चहा, कॉफी ही थोड्या प्रमाणातच घ्या तर तुम्हाला ऍसिडिटी चा त्रास होत असेल तर.
७. अतिरिक्त मांसाहार खाणे. (मांसाहार पचन होण्यास जास्त वेळ लागतो)

८. सततचा तणाव
९. कमी प्रमाणात झोप.
१०. धूम्रपान
११. मद्यपान

औषधांचे दुष्परिणाम

तुम्ही बघितले असेल डॉक्टर जेव्हा तुम्हाला औषधे देतात त्यामध्ये एक औषध (गोळी) हि ऍसिडिटी साठी दिली जाते कारण ठराविक औषधे ऍसिडिटी तयार करतात. म्हणून औषधे लिहताना डॉक्टर त्यामध्ये त्याचा समावेश करतात.
जसे की,
१. शरीर (अंग ) दुखणे कमी करणाऱ्या गोळ्या (पेनकिलर )
२.अँटिबायोटिक्स
३.काही रुग्णांना अचानक भीती वाटणे, झोप न येणे असे त्रास होत असतात तर अशा गोळ्या पणन ऍसिडिटी तयार करू शकतात.

उपचार

१. तुमचे डॉक्टर तुम्हाला अँटासिड (ऍसिडिटी वरचे औषध ) देतील किंवा जर ऍसिडिटी कमी असेल तर तुम्ही ते मेडिकल मधून सुद्धा घेऊ शकता . (जर तुम्हाला असा त्रास खूप दिवसापासून होत असेल तर तुमच्या डॉक्टरांची भेट घ्या )
२. तुमची तपासणी करून तुमचे डॉक्टर काय खावे व काय खाऊ नये हे सांगतील.
औषंधाची नावे
१. ओमी
२. रॅनटॅक
३.पॅंटोसेक
४.पॅन

तुम्ही घरी हे उपचार करू शकता 

१. दिवसातून किमान दोन लिटर पाणी प्यावे.
२. नारळ पाणी सुद्धा तुम्हाला मदत करेल.
३. एक चमचा अँपल साइडर व्हिनेगर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून पिऊ शकता .
४. केली व काकडीचे सेवन करू शकता
५. कलिंगड चा रस घेऊ शकता .

प्रकाश येडगे ( डी,फार्मा. बी,फार्मा )

मूळव्याध काय आहे? उपचार

अधिक माहितीसाठी इथे क्लीक करा 

टीप: कोणतेही उपचार घेताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.