पल्स ऑक्सिमीटर(Pulse Oximeter) in marathi

पल्स ऑक्सिमीटर(Pulse Oximeter) in Marathi

आता कोरोनापासून बचाव करणे झाले अगदी सोप्पे … ?

हो… तुम्ही बरोबर ऐकताय,

आता घरबसल्या आपण जाणून घेऊ शकतो आपल्या शरीराची स्थिती तेही एका छोट्याशा डिव्हाइस च्या साहाय्याने .

आता आपल्या कुटुंबाची काळजी घेणे झाले अगदी सोप्पे.

जाणून घ्या हे पल्स ऑक्सिमीटर डिव्हाइस कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्याला कसे व कोणत्या प्रकारे मदत करेल.

जाणून घ्या पल्स ऑक्सिमीटर डिव्हाइस नक्की काय आहे व ते कसे काम करते.

पल्स ऑक्सिमीटर(Pulse Oximeter) in marathi

 

गेले बरेच दिवस आपण कोरोना ( covid-19) शी लढत आहोत. कोरोनाने संपूर्ण जगभर हाहाकार माजवला असताना अजून त्याच्यावर कोणतेच औषध मार्केट मध्ये आलेली नाही त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. दिवसेंदिवस त्याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संपूर्ण जग त्याने विस्कळीत केले आहे.अशा मध्ये आपले डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी त्याच्याशी लढत आहेत.

 

या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना या डिव्हाइस बद्दल माहिती असणे गरजेचे आहे. आपला थोडा वेळ देऊन त्याच्या बद्दल माहिती करून घेऊन आपण आपल्या परिवाराला या संकटातून वाचवू शकतो.

तर जाणून घेऊ या पल्स ऑक्सिमीटर बद्दल महत्वपूर्ण माहिती.

 

ऑक्सिजन चे महत्तव.

पल्स ऑक्सिमीटर(Pulse Oximeter) in marathi                        Pulse Oximeter

 

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे जर आपल्या शरीराला ऑक्सिजन भेटला नाही तर आपण जगू शकत नाही. कोरोना हा विषाणू आपल्या नाक व तोंडा मार्गे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. व आपल्या फुफ्फुसांवर परिणाम करतो. व त्याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करतो ज्याच्यामुळे रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो तसेच हृदय आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पुरवठ्याचे काम करते. विषाणू मुळे आपल्या हृदयावर परिणाम झाल्यावर त्याच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये गरज असलेल्या ऑक्सिजन चा पुरवठा कमी होतो. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते त्यामुळे रुग्णाला ऑक्सिजन देणे गरजेचे पडते व डॉक्टर व्हेंटिलेटर च्या साहाय्याने रुग्णाला ऑक्सिजन चा पुरवठा करतात.

 

पल्स ऑक्सिमीटर काय आहे ?

 

पल्स ऑक्सिमीटर हे आपल्या शरीरामधील ऑक्सिजन ची पातळी व हृदयाचे ठोके मोजण्याचे एक डिव्हाइस आहे. ज्याच्या मदतीने आपण आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी जाणू शकतो. जर आपल्या शरीरातील ऑक्सिजन ची पातळी कमी झाली असेल तर आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांची मदत घेऊन प्राथमिक स्थळावर आपण उपचार घेतले तर आपण त्यातून लवकर बरे होऊ शकतो. ऑक्सिजन पातळी कमी झाली म्हणजे आपल्याला  कोरोना झाला असे नाही, तुम्हाला दुसरा पण काय आजार असू शकतो त्यामुळे घाबरून जायची गरज नाही अशा वेळेस जवळच्या आरोग्य केंद्राला भेट द्या अथवा जवळच्या डॉक्टर्स चा सल्ला घ्या. हे डिव्हाइस तुम्ही तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवून त्याचा वापर करू शकता. हे वापरणे खूप सोपे आहे. एकदम सोप्या डिव्हाइस ने तुम्ही घरी बसून तपासणी करू शकता. हे डिवाइस वापरताना तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास किंवा दुखापत होणार नाही.

 

पल्स ऑक्सिमीटर काय काम करते ?

हे डिव्हाइस आपल्याला हृदयाची कार्य करण्याची स्थिती दर्शवते आपले हृदय कशा प्रकारे काम करत आहे याचा आढावा देते. तसेच त्याचे कार्य किती व्यवस्थित चालू आहे हे समजते.

हे डिव्हाइस कसे काम करते.

हे क्लिप सारखे डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये आपण आपले बोट त्याच्यामध्ये ठेवायचे. आपण आपले बोट त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर ते आपल्या शरीरातील ऑक्सिजनची ची मात्रा व हृदयाचे ठोके या दोघांची रेटिंग देते. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची वेदना अथवा इजा होत नाही .

 

ऑक्सिजन मात्रा किती असावी ?

वय सरासरी हृदयाचे ठोके सरासरी ऑक्सिजन मात्रा
२ वर्ष १० वर्ष व त्यापेक्षा अधिक ९०-१००%(सरासरी

९५-१००%( उत्तम)

२-१० वर्ष ६०-१४० ९०-१००%(सरासरी

९५-१००%( उत्तम)

१० वर्ष व त्यापेक्षा अधिक ५०-१०० ९०-१००%(सरासरी

९५-१००%( उत्तम)

 

निरोगी व्यक्ती मध्ये ऑक्सिजन ची मात्रा ९५-१००% असते .

सरासरी ९०-१००% असते .

काही केसेस मध्ये ऑक्सिजन ची मात्रा ४०% पर्यंत खाली येते त्याला हैप्पी हायपॉक्सिया म्हणतात.

कोरोनासाठी हि चाचणी कशी फायदेशीर ठरेल.

कोरोना झालेल्या रुग्णाला जास्तीत जास्त श्वास घ्यायला त्रास होतो कारण त्याच्या शरीरामध्ये ऑक्सिजन ची मात्रा कमी होते. ऑक्सिजन ची मात्रा कमी झाली असता त्या रुग्णाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे संक्रमित व्यक्ती आपल्या शरीरातील मात्रा या डिव्हाइस द्वारे जणू शकतो. तसेच लोक आपली घरी बसून चाचणी करू शकतात. जर तुमची ऑक्सिजन मात्रा ९५% पेक्षा कमी असेल तर तुम्हाला डॉक्टर चा सल्ला घेणे गरजेचे आहे. जर तुमचा ऑक्सिजन ९५% पेक्षा अधिक आहे तर तुम्ही निरोगी आहेत.

आजच पल्स ऑक्सिमीटर खरेदी करा व आपल्या कुटुंबाला कोरोनापासून वाचवा.

काही अडचण असल्यास आपल्या जवळच्या डॉक्टर चा सल्ला घ्या.

हे करा ,
1)मास्कचा वापर करा.
2)दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलताना सुरक्षित अंतर ठेवा.
3)आपले हात नेहमी साबणाने धुवा.
4)गर्दीत जाणे टाळा.
5)सरकारने दिलेल्या सूचनांचे नियमित पालन करा.

6)शिंकताना अथवा खोकताना रूमालाचा वापर करा
                                                                                  ”घरी राहा , सुरक्षित राहा”

ऑक्सिजन पातळी कमी झाली म्हणजे आपल्याला  कोरोना झाला असे नाही, तुम्हाला दुसरा पण काय आजार असू शकतो त्यामुळे घाबरून जायची गरज नाही अशा वेळेस जवळच्या आरोग्य केंद्राला भेट द्या अथवा जवळच्या डॉक्टर्स चा सल्ला घ्या.

पल्स ऑक्सिमीटर खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.