मूळव्याध काय आहे ? उपचार | Piles in Marathi

Piles in Marathi

मूळव्याध – उपचार  

Piles in Marathi

मूळव्याध काय आहे ? हा आजार कसा होतो ? व त्यावर उपाय काय ?

आपल्या गुदद्वारा मध्ये असलेल्या रक्तवाहिन्या मोठ्या होऊन त्याचा कोंब बनणे म्हणजेच मूळव्याध होय. हे कोंब गुदद्वार आणि गुदाशय मध्ये असतात.तसे बघता मूळव्याध कशामुळे होतो हे सांगणे कठीण त्याची बरीच कारणे असू शकतात. मुख्यतः आपल्या आहारामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी होत असेल तर हळू हळू हा आजार होऊ  शकतो.

मूळव्याध मध्ये शौचातून रक्त गेलेच पाहिजे असे नाही तर काही रुग्णामध्ये शौचातून रक्त स्त्राव होतो तर काहींच्या होत नाही. सौम्य लक्षणा मध्ये रुग्णाच्या गुदद्वाराच्या बाजूला खाज सुटते. अशा रुग्णाला शौचास कायम जोर देऊन करावी लागते. शौचास बसल्यावर कोंब बाहेर येऊ शकतो व तो नंतर हाताने आत ढकलावा लागू . रुग्णाला शौचास बसल्यावर तीव्र वेदना होऊ शकतात

रुग्णाने काय काळजी घेतली पाहिजे ?

जास्त प्यावे व मद्यपान टाळावे.

शौचास आल्यावर जास्त उशीर करू नये कारण असे केल्यास शौच अधिक कठीण होऊ शकतो व त्यामुळे शौचास जास्त जोर द्याची गरज लागेल व  त्याला  वेदना होऊ शकतात .

ज्या रुग्णाचे वजन जास्त आहे अशा रुग्णाने आपले वजन नियंत्रित करावे

आहारा मध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त ठेवावे

निदान

बहुतेक वेळा अशा रुग्णाला डॉक्टर गुद्द्वारा जवळ लावण्यास मलम देतात. त्याने वेदना कमी होऊन रुग्णास आराम मिळतो.

जर रुग्णाला जास्त त्रास व वेदना होत असतील तर डॉक्टर गुदाशय व गुदद्वाराची तपासणी करतात. अशा मध्ये डॉक्टर एक पोकळ नळी ज्याला प्रोक्टोस्कोप बोलतात हि नळी रुग्णाच्या शौचाच्या जागेतून आत घातला जातो त्याच्या मदतीने आतल्या भागाची तपासणी करता येते.

मूळव्याधीचे प्रकार

१ ) पहिली पायरी – या मध्ये मुख्यता गुदद्वाराच्या आतील बाजूस लहान कोंब /सूज येतो. हा कोंब दिसून येत नाही

२)दुसरी पायरी – या मध्ये गुदद्वाराच्या आतील बाजूस मोठा कोंब / सूज येते. शौचाच्या वेळी हि सूज/कोंब बाहेर येते

३)तिसरी पायरी – या मध्ये लहान गाठी गुदद्वाराच्या बाहेर लटकताना दिसतील ज्या आत ढकलता येतात

४)चौथी पायरी – या मध्ये मोठ्या गाठी गुदद्वाराच्या बाहेर लटकतात ज्या आत ढकलता येत नाही

उपचार –

सौम्य लक्षणे असताना तुम्ही मेडिकल मधून हे मलम घेऊन वापरू शकतात जे तुम्हाला अराम देतील
पिलेक्स फोर्टे मलम


हिमालया कंपनी चे पिलेक्स फोर्टे मलम मुळव्याधी मध्ये खूप गुणकारी आहे जे तुम्हाला सहज पणे मेडिकल स्टोर मध्ये भेटेल जे तुम्हाला वेदना पासून मुक्तता देईलच आणि रक्त स्त्राव कमी करण्यास करण्यास पण मदत करेल
हाडेन्स मलम

अशा मलम ने नआराम होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो उपचार घ्या.

औषधमित्र – प्रकाश येडगे (D.Pharma, B.Pharma – Mumbai university)

माहिती साठी

know more about Migrane