संडास साफ होण्यासाठी उपाय- बद्धकोष्ठ

संडास साफ होण्यासाठी उपाय- बद्धकोष्ठ
बद्धकोष्ठ (मालविरोध ) constipation
आपल्याला होणारे सर्व आजार हे आपल्या दैनंदिन दिनचर्यावरच अवलंबून असतात म्हणजे आपण कशा प्रकारे आहार घेतो आपण दिवसातून किती वेळ शरीरासाठी कसरत करण्यासाठी देतो हेच. शरीरामध्ये आजाराची सुरवात हि पोटामधूनच होते म्हणजे आपण जे जंक फूड खातो त्यातून मुख्यतः त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींना महत्व देणे अत्यंत गरजेचे आहे. चुकीचा आहार न चुकीच्या दिनचर्या मुळे होणारा असाच एक रोग म्हणजे बद्धकोष्ठ.संडास साफ होण्यासाठी उपाय- बद्धकोष्ठ.

या लेखामध्ये आपण या संबंधित सर्वच माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत वाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.संडास साफ होण्यासाठी उपाय काय केले पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत.
बद्धकोष्ठ लक्षणे
बद्धकोष्ठ म्हणजे पोट साफ न होणे, कठीण स्वरूपात शौचास होणे तसेच मलत्याग करताना त्रास होणे.
जेव्हा बद्धकोष्ठाचा त्रास होतो तेव्हा आपली पचन क्रिया बिघडलेली असते व त्यामुळे पोट साफ होत नाही.
म्हणजेच एकंदरीत बद्धकोष्ठ न होण्यासाठी आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला माहित पाहिजे.
बद्धकोष्ठ कारणे
बद्धकोष्ठ होण्यामागे दैनंदिन जीवनामधील भरपूर कारणे आहेत, दैनंदिन जीवनामध्ये खालील गोष्टींचा नीट वापर करताय तर तुम्ही आजारापासून नक्कीच लांब राहू शकता.
१. पाणी
२. पौष्टिक आहार
३. नियमित व्यायाम
१. पाणी–
पाणी हा जीवनाचा मूलभूत घटक मानला जातो. पाणी हे शरीराला भरपूर पद्धतीने मदत करते ते आपले शरीर स्वच्छ करण्याच्या कामासोबतच ते शरीरामधील घाण बाहेर काढते. अन्न पचन करण्यास मदत करते. शरीरामधील विषारी घटक बाहेर काढते.
जेवण करताना पाणी घेता ?
जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्ही चुकीच्या वेळेत पाणी घेताय जेव्हा आपण जेवण करतो न ते अन्न पोटामध्ये जाते तेव्हा त्यामध्ये पाचकरस मिसळला जातो जो अन्न पचन करण्यास मदत करत असतो अशा वेळेस पाणी पिल्यावर पाणी पाचकरस पातळ करते व त्यामुळे अन्न पचन क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पाणी हे जेवणाच्या १ तास अगोदर किंवा १ तास नंतरच घ्या जे पचन क्रिया मध्ये अडथळा नाहीतर पचन क्रिया करण्यास मदत करेल.
२. पौष्टिक आहार

मानवाच्या ३ मूलभूत गरजा आहेत त्यामधील आहार हि एक महत्वाची गरज. चुकीच्या आहार पद्धतींमुळे आपण बऱ्याच आजारांना आमंत्रण देत असतो.जंक फूड आपल्या शरीराला हानिकारक आहेत त्यामुळे वापरलेले घटक पचण्यासाठी वेळ घेतात व त्यामुळे ते नीट पचन होत नाहीत त्यामुळे जंक फूड खाणे टाळा .
३. नियमित व्यायाम
ज्यापद्धतीने शरीराला अन्नाची गरज असते त्या पद्धतीनेच ते पचन करण्यासाठी शरीराला नियमित व्यायामाची सुद्धा गरज असते. नियमित व्यायाम केल्याने आपले शरीर निरोगी राहते.
यामुळे तुम्हाला जाणवू शकतो बद्धकोष्टीचा त्रास
१. कमीमात्रा मध्ये पाणी पिणे.
२. पौष्टिक आहार न घेणे, जंक फूड जास्त खाणे.
३. नियमित व्यायाम न करणे.
४. जीवनसत्वे व खनिजांची कमतरता असणारे आहार.
५.जास्त प्रमाणात मांस सेवन करणे.
६. नियमित जेवण न करणे.
७. चहा, कॉफी चे अतिप्रमाणात सेवन.
८. जेवण करताना घास नीट न चघळता गिळणे.
९. गरजेपेक्षा जास्त खाणे
शरीराची हालचाल न करता एकाच जागी बसून राहता तर काळजी घ्या अशाने तुमचे स्नायू कमजोर होतात व बद्धकोष्ठ होतो त्यामुळे बसून काम करत असाल तर थोड्या वेळासाठी उठून थोडी शरीराची हालचाल करा.
बद्धकोष्ठ तुम्हाला पुढील आजारांना आमंत्रण देऊ शकते.
१. गाठ येणे
२. सुस्त यकृत
३. अतिप्रमाणात ऍसिडिटी
४. गुदाशय व पोटाचे आजार
५. मधुमेय
६. गर्भाशयाचे रोग
तुम्ही तुमचे पोट नियमित साफ करत असाल तर तुम्ही निरोगी राहू शकता, दिवसातून किमान २ वेळेस मलत्याग करणे गरजेचे असते. हे प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून आहे
बद्धकोष्ठता पासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही नैसर्गिक डाईट घेऊ शकता.
काय घेतले पाहिजे ?
१. महत्वाचा घटक म्हणजे नैसर्गिक आणि साधा आहार.
२. मध, गुळ आणि मसूर.
३. हिरव्या पालेभाज्या : पालक,बीन्स, टोमॅटो, कांदा, कोबी,फुलकोबी,भोपळा,बीट,शतावरी,गाजर.
४. फळे: द्राक्षे, अंजीर,पपई,आंबा.
५. हिरवी फळे: पेरू, संत्री, अंजीर.
६. कोरडी फळे: मनुका,खजूर
७. दुधाचे पदार्थ : लोणी,तूप
काय घेणे टाळले पाहिजे ?
ब्रेड,केक, पेस्ट्री, बिस्कीट, मांसयुक्त पदार्थ, साखरेचे पदार्थ.
केळी व जॅक फ्रुटस वगळता बाकीचे फ्रुटस चालतील.
बद्धकोष्ठ उपाय
पेअर फळ हे बद्धकोष्ठ मध्ये फायदेशीर ठरणारे फळ आहे.
तीव्र त्रास होणाऱ्या रुग्णाने याचे रोज सेवन अथवा त्याचा रस करून पिल्याने आराम मिळतो. जेवणानंतर अथवा नाश्त्यासोबत सुद्धा कमी आकाराच्या फळाचे सेवन करू शकता. तसेच पेरूचं सुद्धा आहे पेरू त्यामधल्या बियांसोबत खाल्ल्याने मदत मिळते.
बद्धकोष्ठ पासून मुक्तता मिळण्यासाठी द्राक्षे सुद्धा फायदेशीर आहेत.
मुख्यता द्राक्षे मध्ये सेल्युलोस, साखर आणि सेंद्रिय आम्लाचे गुणधर्म असतात त्याचा उपयोग पोट साफ करण्यासाठी केला जातो. द्राक्षे फक्त आतडे साफ करण्याचं काम न करता त्याचे काम सुरळीत करण्याचे काम करते. जर ताजे द्राक्षे नसतील तर तुम्ही द्राक्षे पिण्याच्या पाण्यामध्ये २४-४८ ठेवा द्राक्षे त्यांच्या मूळ स्थितीत येतील ते सकाळी खाऊ शकता व तो पाणी त्याच्यासोबत पिऊ शकता.
पाणी तांब्याच्या भाड्यात रात्रभर ठेवा सकाळी त्याला हलके कोमट करा त्यामध्ये लिंबूचा रस टाका व थोडे मीठ मिसळा व त्याचे सेवन करा.
जवस (अलसी) लिन्सीड पाण्यामध्ये टाकून जेवणाच्या अगोदर घेऊ शकता.
किमान ७ दिवस फळांचा डाएट करा फक्त फळांचे सेवन करा, कमजोर रुग्ण संत्र्याचे सेवन करू शकतो. डाएट झाल्यानंतर लगेच जड आहार घेऊ नका कारण तुमची पचन क्रिया कमकुवत झालेली असते त्यामुळे थोडे थोडे न पौष्टिक आहार घ्या. उपवास ज्याला आपण डाएट पण बोलू शकतो जे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढेल व रक्त शुद्ध करण्याचे काम करेल
ताजी हवा, मैदानी खेळ, चालणे, पोहणे, व्यायाम या मुले स्नायूंचा व्यायाम होतो त्यामुळे ते बद्धकोष्ठ रोखते.
बद्धकोष्ठता आराम मिळण्यासाठी तुम्ही योगासना करू शकता.
कोणते योगासने फायदेशीर ठरतात ?
भुजंगासन
शालभासन

योगमुद्रा
धनुरासन

हलासन

पश्चिमोत्तानासन
प्राणायाम
अनुलोमा-विलोमा

भस्त्रिका
जलनेती

कोणतेही उपाय करताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अधिक माहितीसाठी विकिपीडिया ला भेट द्या.
ऍसिडिटी : लक्षणे,कारणे, उपाय अशी घ्या काळजी