Information about Corona Virus in Marathi

INFORMATION ABOUT CORONA VIRUS IN MARATHI

 

जाणून घ्या जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस ची माहिती.
हा आजार कसा होतो ?
आपण आपली सुरक्षा कशी करू शकतो
या आजाराची जगभरातली स्थिती.
सिम्प्टोम्स ऑफ कॉरोन आपण काय करणे टाळले पाहिजे .

 

कोरोना व्हायरस काय आहे ? ( CORONA VIRUS IN MARATHI ) ( CORONA VIRUS MEANING IN MARATHI )

 

कोरोनाव्हायरस (COV ) हा एक विषाणूंचा गट आहे ज्यामुळे साध्या सर्दीपासून ते श्वसन प्रकियेपर्यंत म्हणजेच श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या रोगांपर्यंत आजार उदभवतात . कोरोनाव्हायरस ला वुहान व्हायरस पण बोलले जाते. हा एक नवीन आजार चीन मधून जगभरात पसरला आहे. या आजाराने चीन मध्ये हाहाकार माजला आहे. हा एक संसर्गजन्य रोग असून तो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो.

कोरोनाव्हायरस ची लक्षणे ( SYMPTOMS OF CORONA VIRUS IN MARATHI )

ताप
सर्दी
खोकला
धाप लागणे( श्वास घेण्यास त्रास होणे )
थकवा येणे
तसेच गंभीर लक्षणे
न्यूमोनिया
मूत्रपिंड निकामी होणे

या आजारामध्ये मृत्यू पण होऊ शकतो
या आजारापासून वाचण्यासाठी नियमित हे करा
वारंवार हात स्वच्छ धुणे
खोकला आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकणे
खोकला आणि शिंका यांसारख्या श्वसनाच्या आजाराची लक्षणे असलेल्या व्यक्तीशी संपर्क टाळणे.

तुम्ही काय कराल ?

१) आपले हात अल्कोहोल आधारित साबणाने स्वच्छ करा
२) दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना अंतर ठेवा.स्वतःमध्ये आणि खोकला किंवा शिंका येत असलेल्या प्रत्येकामध्ये किमान १ मीटर ( ३ फूट ) अंतर ठेवा .
का ?
जेव्हा एखाद्याला खोकला किंवा शिंका येतात तेव्हा त्याच्या नाकातून किंवा तोंडातून लहान द्रव थेंब बाहेर पडतात ज्यात विषाणू असू शकतात.
जर तुम्ही त्या व्यक्तीच्या खूप जवळ असल्यास ते विषाणू त्याच्या द्रव थेंबातुन तुमच्या श्वसनलिकेतून तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात.

३) डोळे , नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा कारण विषाणू आपल्या डोळे, नाक , तोंडावर असू शकतात.
४) जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येतील तेव्हा तोंड आणि नाक रुमालाने झाकून घ्या. वापरात असलेला रुमाल प्रत्येकवेळी स्वच्छ धुऊन घ्या अथवा त्याची त्वरित विल्हेवाट लावा.
५) जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लवकर डॉक्टर चा सल्ला घ्या.
६) आपल्याला अस्वस्थ वाटत असल्यास घरी राहा.
७) अधिक माहिती साठी त्वरित आपल्या जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये भेट द्या .
८) सर्व माहिती समजून घ्या आणि आपल्या आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे योग्य ते पालन करा.

AND

 

आपण आपली सर्व कामे आपल्या हाताच्या मदतीने करतो म्हणजे आपला हात दिवसातून बऱ्याच वस्तूंना स्पर्श करतो त्यामुळे आपण आपल्या हाताची काळजी घेणे गरजेचे आहे कारण विषाणू हाताला लागून आपल्या शरीरात स्पर्श करू शकतात.
मग आपण आपल्या हाताची काळजी कशी आणि कधी घ्यायची ?

१) आपले हात अस्वच्छ वाटत असतील तर ते साबण व पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
२) खोकला किंवा शिंका आल्यावर
३) आजारी व्यक्तीची काळजी घेत असाल तर
४) जेवण बनवण्या अगोदर
५) प्राण्यांना हाताळ्यानंतर

हे करणे टाळा

१) सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा
२) जर तुम्हाला ताप किंवा खोकला असेल तर प्रवास टाळा
३) खोकला व ताप असलेल्या व्यक्तीला स्पर्श करणे टाळा.

उपचार
१) या आजारावर निश्चित असे औषध सध्या उपलब्ध नाही.
२) निर्माण झालेल्या लक्षणांवर चिकित्सा केली जाते .

NEWS ABOUT CORONA VIRUS IN MARATHI ( CORONA VIRUS IN CHINA INFORMATION IN MARATHI)

कोरोनाव्हायरसची सुरुवात

हा आजार प्रथम चीन या देशामध्ये प्रसारित झाला आणि चीन मध्ये सर्वात अधिक बळी गेले. या आजारामुळे चीनमध्ये ३०४२ जणांचा बळी गेला असून अजून ८०,५५२ जणांना लागण झाली असल्याचे समोर आले आहे .

भारतामध्ये कोरोनाव्हायरस
दिनांक ०५ मार्च २०२० पर्यंत भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा ३१ इतका आहे. या आजाराने अजून भारतात एकही मृत्यू झालेला नाही.

महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस
महाराष्ट्रामध्ये दिनांक ०५ मार्च २०२० रोजी पर्यंत एकही कोरोना रूग्ण आढळलेला नाही .

live update राहण्यासाठी आणी संख्या बघण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.

live counting

अधिक माहिती साठी खाली क्लीकी करा.

CORONA VIRUS ACCORDING TO WHO