Leptospirosis meaning in marathi

लेप्टोस्पिरोसिस ( leptospirosis ) हा एक जिवाणूजन्य रोग आहे हा तुम्हाला पावसाळ्यात होणाऱ्या पाण्याच्या साठ्यामुळे होऊ शकतो . याचा प्रसार उंदीर व पाळीव प्राणी म्हणजे  कुत्रा, मांजर, गाय, यांच्या लघवीतून होतो . लेप्टोस्पिरोसिस जिवाणू पाण्यात तसेच चिखलात अनेक महिने जिवंत राहू शकतात.

आपण आपल्या दैनंदिन जीवनात विशेषतः पावसाळ्यात आपल्या शरीराची काळजी घेत नाही, म्हणजे आपण पावसाळ्यामध्ये गरम पाण्याचा वापर करत नाही ,तसेच  आपण पावसाळ्यात बाहेरचे पाणी पितो व उघड्यावरचे अन्न पदार्ख न विचार करता खातो. तसेच साचलेल्या पाण्यात उड्या मारत चालत कसेही वावरतो आणि त्याच पाण्यात खूप सारे धोकादायक जिवाणू असतात याचा आपल्याला कधीच अंदाज नसतो.  त्यामुळेच लेप्टोस्पिरोसिस  सारख्या आजाराला  आपण बळी पडतो.

लेप्टोस्पिरोसिस रोगाचा प्रसार आणि कारणे

आपल्या आजूबाजूला जनावरे फिरत असतात त्यामध्ये काही जनावरे बाधित असतात आणि त्यांच्याच मूत्रातून या रोगाचे जिवाणू पाण्यामध्ये पसरतात आणि ते अनेक आठवडे टिकून राहतात . हे जिवाणू विशेषतः आपल्या पायावर असलेल्या जखमेतुन शरीरात प्रवेश करतात आणि संपूर्ण शरीरभर पसरतात आणि या रोगाचा उगम आपल्या शरीरामध्ये होतो . या रोगाचा प्रसार प्रामुख्याने पिण्याचे पाणी दूषित असेल तर होऊ शकतो आणि या रोगाचा प्रसार जास्तीत जास्त पावसाळ्यात होतो कारण आपण पित असलेलं पाणी दूषित असू शकते.

लक्षणे

या आजाराची लक्षणे मलेरिया डेंग्यू ताप या आजारासारखी  असतात . मुख्य म्हणजे हा आजार जर एखाद्या व्यक्तीला झाला तर त्याची जाणीव त्याला लगेच होत नाही म्हणजे त्याची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत त्यामुळे अशा आजारांना बरेच व्यक्ती बळी पडतात. जेव्हा हे जिवाणू शरीरात प्रवेश करतात तेव्हा ते लगेच लक्षणे दाखवत नाहीत तब्बल  दोन ते तीस  दिवसांनी त्याची लक्षणे दिसण्यास सुरवात होते.

लेप्टोस्पिरोसिस या आजाराची प्राथमिक  लक्षणे खालील प्रमाणे

तीव्र ताप

थंडी वाजून येणे

डोके दुखी

अंगदुखी

थकवा

घसा  खवखवणे

कावीळ

उलट्या होणे

अतिसार

डोळे लाल  होणे

स्नायूं वेदना

 

हि लक्षणे आजाराच्या पहिल्या टप्प्यात दिसून येतात हि लक्षणे कधी कधी जास्त दिसून येतात जर हि लक्षणे आढळताच वेळेवर उपचार केल्यास तो रुग्ण  बरा होऊ शकतो परंतु जर अधिक काळ रुग्णाला योग्य तो उपचार नाही भेटला तर आजार बळावू शकतो.

निदान

आपल्या जवळ पासच्या डॉक्टर कडे आपण रक्त आणि लघवीची चाचणी करून या रोगाचे निदान करू शकतो.

उपचार

रुग्णाला परिणामकारक  अँटिबायोटिक्स देऊन त्याला रुग्णालयात भरती करावे.

तुम्ही काय काळजी घ्याल ?

तुमच्या घराच्या आजू बाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.

बाहेरचे थंड पाणी पिऊ नका.

उघड्या वरचे अन्न टाळा.

घरातील अन्न झाकून ठेवा.

उघड्या पायाने पावसाच्या पाण्यात फिरू नका.

पायावर जखम असल्यास त्याला व्यवस्थित उपचार करा.

हात मोजे पाय मोजे यांचा वापर करा.

पावसाच्या पाण्यातून आल्यावर लगेच आपले हात व पाय साबणाने स्वच्छ धुवावेत.

if you want to know leptospirosis meaning in English visit this site CDC click on cdc

सेलफोनवर बोलताना आपण आपला डावा कान का वापरावा?

Categories: Marathi Blog

pharmamad

BOTH diploma completed in PHARMACY, Degree is in Process. hungry for knowledge, wanted our students be successful.wanted to share our knowledge about pharma as well as out of the box.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp chat